Breaking News

थायलंड सहल, 17 जणांची नऊ लाखांची फसवणूक

सोलापूर, दि. 02, जून - थायलंड सहल म्हणून 17 जणांकडून पैसे घेतले. नंतर रद्द करून पैसे परत दिले नाही म्हणून एकाविरुद्ध विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन गायकवाड (रा. अंबेगाव, जिल्हा पुणे) यांनी थायलंड सहलीसाठी 17 ग्राहकांकडून पैसे घेतले. प्रत्यक्षात विमान तिकिटाचे पैसे कंपनीला भरलेच नाहीत. 17 ग्राहकांची 9 लाख रुपयांची फसवणूक झाली. याबाबत तक्रार केल्यानंतर 4 लाख 90 हजार परत केले.उर्वरित पैसे दिलेच नाही. पंडित बनसोडे (जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दिली.