शिवाजी महाराजांचा वापर राजकीय माल म्हणून केला जातोय- मनोहर भिडे
नाशिक/प्रतिनिधी :
शिवाजी महाराजांच नाव घेऊन राजकारण केलं जातंय, काळ तोंड नीळ करण्यासाठी महाराजांच नाव तोंडातून काढलं जात, फक्त सत्ता आणि राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी महाराजांच नाव वापरलं जात आहे हेच या समाजाचं दुर्दैव असल्याचे उद्दगार शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष सभांजी भिडे यांनी काढले.
नाशिक येथील वडांगळीकर स्वामी मंगल कार्यालयात आयोजित सभेत ते बोलत होते. देशातील 29 राज्यातील पैकी महाराष्ट्रात सर्वाधिक दारूचा खप असलेलं राज्य आहे. याचा महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे. दहा कोटी तेहतीस लाख लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात दर दिवशी एक कोटीहुन अधिक लोक रोज दारू पितात अशा समाजाला शिवाजी महाराजच नाव लायकी नाही. आणि अशांना महाराजांच नाव तोंडात घेण्याचा अधिकार नाही.
राज्यकर्ते म्हणजे काय दुधावरची साय आहे. आपण शिव जयंती वर्षातून तीन वेळा साजरी करतो म्हणजे असा हा लबाड शिव भक्ती असलेला लबाडांचा महाराष्ट्र आहे. भारताच्या संरक्षणासाठी भूदल, पायदळ आहे. पण राष्ट्राच खरं बळ चारित्र्य शुद्ध आचरणांनाचा आहे. चीन संस्कृत शब्द आहे आणि चीन हे हिंदू राष्ट्र आहे तसच तुर्कस्थान, अफगाणिस्थान हे आपले राष्ट्र आहेत. जपान हा जयपान हा अप भृशं झालेला आहे. संपुर्ण जगात हिंदुस्थान सारखा देश नाही. तरीही त्याची संस्कृती टिकवण्याची आमची लायकी नाही.
कस्तुरीमृग ही फक्त हिंदुस्थानात मिळते. तरीही भारताचा सुगंध कुठेय. राष्ट्रीयत्वच्या बाबतीत हा देश वांझोटा झालाय. जो देश जो समाज पूर्वजांचा इतिहास वाचणार नाही तो देश संघर्षात वाचणार नाही. त्यामुळे हिंदु संस्कृती टिकवण्यासाठी स्वतंत्र सत्ता असणे गरजेचे आहे असेही भिडे म्हणाले.
