Breaking News

संविधान अभेद्य; आणीबाणीविरोधात लढलेल्यांना सलाम

लोकशाही पायदळी तुडवणार्‍याकडून संविधान बचावचा नारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका 
मुंबई : व्यक्तिस्वातंत्र हिरावून घेत ज्यांनी देशात जाचक आणीबाणी लादली आणि संविधान पायदळी तुडवले, तेच लोक आता संविधान बचावचा नारा देत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. ते मुंबई भाजपने बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आणीबाणी विषयावर बोलत होते.
मोदी म्हणाले देशात 26 जून 1975 रोजी इंदिरा गांधी सरकरने देशात आणीबाणी जाहीर केली होती. त्यावेळी सरकारच्या विरोधात बोलणार्‍या लोकांना थेट तुरुंगात डांबले जात होते. प्रसारमध्यमांवर बंधने लादली गेली. न्यायव्यवस्थेवर अंकुश लावले गेले. त्या काँग्रेसने संविधान पायदळी तुडवले तेच लोक आता संविधान बचावचा नारा देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीं यावेळी म्हटले. काँग्रेस भाजप विरोधात दलितांमध्ये, मुस्लीम समाजात भय निर्माण करत आहे. पण भाजपने नेहमीच संविधानाचा सन्मान केला असून समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भू मिका अंगिकारली आहे. काँग्रेसने आपल्या सत्तेच्या काळात कधीही संविधान दिवस साजरा केला नाही. पण भाजपने संसदेसह देशभरात संविधान दिन घोषित केला.
पंतप्रधान मोदी यांनी मराठीत आणीबाणी हा उच्चार केला. सर्वजण या काळ्या दिवसाचा धिक्कार करतात, हे पाप काँग्रेसने केले आहे , केवळ एका घराण्याने देश वेठीला धरला असेही ते म्हणाले. राजकीय पक्षावर टीका करण्यासाठी 26 जून हा काळा दिवस म्हणून पाळला जात नाही. तर लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी म्हणून या काळ्या दिवसाचे स्मरण करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. आम्ही देशातल्या तरुणांना जागृत करत आहोत, त्यांना सज्ज करण्यासाठी या काळ्या दिवसाचा आम्ही धिक्कार करतो. मोठ्या चतुराईने तत्कालीन सरकारने घटनेचा गैरवापर के ला होता. या देशात जेव्हा-जेव्हा काँग्रेसला सत्ता चालली असे वाटते, तेव्हा-तेव्हा ते भय निर्माण करतात. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांची परंपरा आहे, सत्तेसाठी त्यांनी पक्षही फोडला. त्यांच्यासाठी व्यक्त ी स्वातंत्र, संविधान याची काहीही किंमत नाही. त्यांनी देशाच्या न्यायव्यसंस्थेलाही भयबीत केले होते. देशात आता स्तिथी बदलत आहे. ज्यांनी देशात व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली, त्याच्यावरही के सेस सुरू आहेत. त्यांनाही आता जामीन घ्यावा लागत आहे, असा टोला ही मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला. हातातून सत्ता जातेय म्हणून ते आता प्रशासन आणि न्यायावस्थेत तसेच निवडणूक व्यवस्थेत घोळ असल्याची आवई उठवत आहेत.
संविधान अभेद्य 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही शक्ती संविधानाच्या मुलभूत ढाच्याला हात लावू शकत नाही. आणीबाणी भारतासाठी काळे युग होते. त्याकाळात भारतातील प्रत्येक संस्थेवर दबाव होता आणि भीतीचे वातावरण तयार झाले. केवळ नागरिकच नव्हे, तर विचार आणि कलाकारांच्या स्वातंत्र्यावरदेखील बंधने आणली गेली, असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्या महिन्यातील ’मन की बात’ कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी आणीबाणीवर टीका केली होती. ’ती अंधारी काळरात्र कदापि विसरू शकत नाही’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आणीबाणीच्या निर्णयाची संभावना केली होती. त्यामुळे आज होत असलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.