Breaking News

देशातील सुंदर शहरात पाचगणीचा समावेश

सातारा : अठराव्या शतकात ब्रिटीशांनी सह्याद्रीच्या पठारावर उन्हाळ्यातील दाहकतेला पर्याय म्हणून सुरुवातीला महाबळेश्‍वर आणि नंतर पाचगणी हे थंड हवेचे शहर त्यांच्या पध्दतीने विकसीत केली. यातले पाचगणी हे देशाच्या पश्‍चिम विभागातले कचरामुक्त सुंदर शहर म्हणून निवडले. त्यामुळे देशभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. अशा या पाचगणीच्या स्वच्छतेचा घेतलेला हा आढावा .... 
पाचगणीचा प्रत्येक नागरिकात हे माझे शहर आहे, माझ घर जस सुंदर दिसाव, स्वच्छ असाव तीच भावना निर्माण करण्यात नगर परिषद कमालीची यशस्वी झाली आहे. सहज एका पर्यटकाने पारशी पा ॅईंटवर कचरा डस्टबीन मध्ये न टाकता खाली टाकला ... चॉकलेट, बिस्कीट विकणारा व्यापारी दुकानातून उठून येवून तो कचरा पेटीत टाकला ... समोरचा पर्यटक संकोचला, तो निदान पाचगणीत असे पर्यंत कचरा खाली टाकणार नाही एवढी त्याची देहबोली सांगत होती.
पाचगणी बसस्टँडवर ड्रायव्हरनी कचरा टाकला तर स्वतः नगराध्यक्ष लक्ष्मी कर्‍हाडकरानी बस थांबवून त्याला कचरा उचलायला लावला ... या शहराचा प्रथम नागरिकच कमालीचा सजग असल्यामुळे तिच शिस्त इतरांमध्ये भिनली आहे. कचरा गोळा करायला गेलेल्या घंटा गाडीतही सुका आणि ओला कचरा वेगवेगळ्या थैलीत आता न सांगता भरला जातो ... शहरातली एक सुंदर गार्डन आहे ... तिथे ओपन व्यायम करण्यासाठी साधने लावले आहेत ... आणि मुलांचे खेळणीही आहेत .. मी मुद्दाम बारीक निरीक्षण करत होतो ... एका मुलाने चॉकलेट खाले आणि तो कचरापेटी शोधत होता ... नंतर तिथल्या गार्डंनी त्याच्या हातातला कचरा घेण्यासाठी हात पुढे केला तर त्या लहानमुलाने नकार दिला ... कचरा कुंडी कुठे आहे सांगा मी स्वत: टाकेन .... या शिस्तीमुळे पाचगणी आता शाश्‍वत सुंदर राहील याची हम्मी देता येते. पाचगणी इतर गिरीस्थानापेक्षा वेगळ काय आहे ... !!
जवळपास महाबळेश्‍वर इतकेच उंच असलेले हे हवेचे ठिकाण. महाबळेश्‍वरपासून हे ठिकाण अवघ्या 18-20 कि. मी. अंतरावर आहे. महाबळेश्‍वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्याजेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे.
लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्‍वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दर्‍या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत. येथील टेबल लँड वर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे.