Breaking News

विहिंप व बजरंग दल दहशतवादी संघटना अमेरिकेची गुप्तचर यंत्रणेचा अहवालात उल्लेख

नवी दिल्ली : अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल या धार्मिक दहशतवादी संघटना असल्याचे म्हटले आहे. सीआयएने आपल्या फॅक्टबुकमध्ये असा उल्लेख केला आहे. सीआयएने या दोन्ही सघटनांना राजकीय दबाव गटात ठेवले आहे. बजरंग दल आणि विहिंपने याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. सीआयएने फॅक्टबुकमध्ये जमीयत उलेमा हिंदला धार्मिक संघटना म्हटले आहे. हुरियत कान्फरन्सला फुटीरतावादी गटात टाकले आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)ला राष्ट्रवादी संघटना असल्याचे म्हटले आहे. बजरंग दलाने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना बजरंग दलाचे राष्ट्रीय समन्वयक यांनी म्हटले आहे, की आम्ही तज्ज्ञांबरोबर संपर्क करत आहोत. ते कायदेशीर कारवाई करू शकतात. 
बजरंग दलाचे म्हणणे आहे, की त्यांच्या संघटनेने कधीही धार्मिक कट्टरता पसरवलेली नाही. ती एक राष्ट्रवादी आणि सांस्कृतिक संघटना आहे. इतर देशांतही त्यांच्या अनेक शाखा आहेत. एवढेच नाही, तर कधीही दहशतवादी कारवायात त्यांनी भाग घेतलेला नाही. बजरंग दलाला हुर्रियतच्या गटात ठेवणे हे आक्षेपार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. द वर्ल्ड फॅक्टबुक यूएस गुप्तचर संस्था सीआयएचे एक वार्षिक प्रकाशन आहे. यात 267 देश आणि तेथील सरकार, इतिहास, भूगोल, लष्कर, राजकीय पक्षांची माहिती असते.