Breaking News

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याची अफवाच...

ठाणे : कल्याण - कर्जत रेल्वे मार्गावरील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याचा निनावी फोन शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आला होता. तब्बल दोन तास विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाची बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉड पथकाने कसून चौकशी केल्यानंतर ही अफवा असल्याचे समोर आले आहे. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याचा निनावी फोन मुंबई कंट्रोलला आल्याने रेल्वे प्रशासन हादरले होते. प्रशासनाने तत्काळ याबाबत माहिती कल्याण रेल्वे आरपीएफ, जीआरपीला कळविली होती. शहर पोलिसांनी बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसह विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर बॉम्बचा शोध सुरू केला. यावेळी प्रवाशांनाही सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा पाहून प्रवासीवर्गात भीतीचे वातावरण दिसून येत होते. अखेर ही अफवा निघाल्याचे समजताच सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्‍वास टाकला.