Breaking News

बँक कर्मचारी संपावर गेल्याने नागरिकांची आर्थिक कुचंबना

शहरातील बँक कर्मचारी दोन दिवसाच्या संपावर गेल्यामुळे नागरिकांचे आर्थिक हाल झाले. सरकार व कर्मचारी संगठना यांच्यातील चर्चा फिसकटल्याने संप सुरु झाला होता, आरबीआयने बँक कर्मचार्‍यांना 5 दिवसाचा आठवडा जाहीर करून, त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे व अत्यल्प पगार वाढ केल्यामुळे कर्मचारी संघटनांनी संप केल्याची माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोपरगावचे व्यवस्थापक नंदकिशोर खैरनार यांनी दिली. 

अतिरिक्त मुख्य कामगार आयुक्त राजन वर्मा यांनी बँक कामगार संघटनांच्या प्रमुखांशी संप मागे घेण्याविषयी चर्चा केली होती. शहरातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, बॅक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक आदी सर्व बँकांचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे ग्रामिण भगातुन येणार्‍या वृध्द पेन्शन धारकांना त्रास सहन करावा लागला. त्यातच एकमेव एटीएमचा आधार काही काळापुरताच ठरला. बँका बंद असल्याने शहरात जमीबाबंदी लागू केल्यासारखी शांतता होती.