शेतकरी प्रशिक्षण शिबीर उत्साहात
यावेळी इंडियन पॉटॅश लि.मी. मुंबई यांच्यातर्फे शेतकर्यांना खत व्यवस्थापनाचे महत्व समजावून सांगितले. पावसाळा सुरु होत असल्याने खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरु असल्याने शेतकर्यांना खताचे महत्व समजले पाहिजे, यासाठी या शिबिराचे आयेाजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयपीएल कंपनीचे संभाजी कोर्डे यांनी केले. यावेळी चेअरमन प्रताप झिने, प्रगतशील शेतकरी बबन शिंदे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.