Breaking News

श्री अंबिका माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचा 100 टक्के निकाल


अळकुटी / वार्ताहर ।  पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा फेब्रुवारी 2018 चा इ. 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असुन, प्रथम क्र. धनश्री दादाभाऊ बेलोटे (62.46). व्दितीय क्र. मोनिका साहेबराव बेलोटे (58.30), तृतीय क्र. अपेक्षा भाऊसाहेब बेलोटे (51.30) तरी विद्यालयाने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव, गोपीचंद बेलोटे, बाबुराव मुळे, सरपंच सुजाता गाजरे, उपसरपंच विकास सावंत, सुभाष बेलोेटे, ज्ञानदेव बेलोटे यांचेसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.