Breaking News

कांद्याने केली ‘हजारी’ पार


कोपरगाव : प्रतिनिधी
येथील बाजार समितीत गुरुवारी {दि. २८} ५ हजार ७०५ कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला एक हजार पाचशे रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे अध्यक्ष संभाजी रक्ताटे यांनी दिली.

ते म्हणाले, दर मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवस कांदा लिलाव होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानी या एक दिवस अगोदरच कांदा वजन मापासाठी आणावा. वरील दिवशी सकाळी १० वाजेला लिलाव सुरु होत असतो. शेतकऱ्यांनी वेळेवर हजर रहावे, असेही रक्ताटे यांनी सांगितले. गुरुवारी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला अकराशे ते पंधराशे, दोन नंबर कांद्याला ८५० ते अकराशे, गोल्टी कांद्याला २५० ते ८५० भाव मिळाला. जोड कांद्यास १०० ते ४०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती सचिव परसराम सिनगर यांनी दिली.