Breaking News

‘डॉ. मेहता’मध्ये शाहू महाराज जयंती उत्साहात


कोपरगाव प्रतिनिधी
येथील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्या एम. एस. सुरवसे, उपप्राचार्य बी. के. गवळी, पर्यवेक्षिका एम. डी. राजेभोसले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

विद्यालयाची विद्यार्थिनी स्वामिनी आवारे हिने शाहू महाराजांविषयी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानीप्राचार्या सुरवसे होत्या. अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत व सर्व सामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवजीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा आपण सर्वांनी घेतली तर या देशात कोणीही आर्थिक प्रगतीमध्ये मागे राहणार नाही. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत सांस्कृतिक स्थापनादिन साजरा करण्यात आला. विद्यालयाचे उपप्राचार्य बी. के. गवळी व उपशिक्षक एन. वाय. निकम यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख श्रीमती एम. पी. हरिदास, श्रीमती एस. आर. साबळे यांनी पुढाकार घेतला. विद्यालयाचे क्रीडाशिक्षक रमेश मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.