हमीभावाने तूर खरेदीची शेतकर्यांना प्रतीक्षा
मुंबई - राज्य शासनाने शेतकर्यांची तूर हमीभावाने खरेदी केली आहे. मात्र, नोंदणी केलेल्या अनेक शेतकर्यांची तूर खरेदी होण्याच्या आधीच हमीभाव तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने तूर खरेदीसाठी 15 मे पर्यंत मुदत वाढवून दिली होती. मात्र, 15 मे पर्यंत राज्यातील शेतकर्यांची तूर खरेदी होऊ शकलेली नाही. त्यामुळे तूर खरेदी केंद्र कधी सुरू होणार याची शेतकर्यांना प्रतीक्षा लागली आहे. राज्यात या वर्षी 115 लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होण्याचा राज्य सरकारचा अंदाज आहे. यापैकी 44 लाख क्विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवलेले होते. मात्र, प्रत्यक्षात 25 लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली असून आणखी 15 लाख क्विंटल तूरखरेदी शिल्लक आहे. जवळपास अडीच लाख शेतकर्यांनी नोंदणी केलेली असूनदेखील त्यांची तूर खरेदी झालेली नाही.
राज्यातील अडीच लाख शेतकर्यांची जवळपास 15 लाख क्विंटल तूर खरेदी करायची शिल्लक आहे. केंद्र सरकारने 15 मेपर्यंत मुदत वाढवून दिली होती. आता 15 जूनपर्यंत मुदत वाढवून द्यावी यासाठी राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख, कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेतली होती आणि लवकरच तूर खरेदीला मुदतवाढ मिळेल, असे सांगितले होते. मात्र, अजूनही तूर खरेदीला मुदतवाढ मिळालेली नाही.