Breaking News

‘संजीवनी’च्या विद्यार्थ्यांची ‘जयहिंद’मध्ये निवड


कोपरगाव शहर प्रतिनिधी

शिक्षण पूर्ण होण्याच्या वाटेवर असताना प्रत्येक तरुण तरुणीला नोकरी मिळेल काय, ही विवंचना भेडसावत असते. परंतु संजीवनी पाॅलिटेक्निकमधील अंतिम वर्षातील विद्यार्थी या विवंचनेत कधीच नसतात. त्यांच्यासाठी संजीवनी पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग प्लेसमेंटच्या विभागामार्फत सातत्याने नामांकित कंपन्यांना आमंत्रित केले जाते. या अनुषंगाने पुणे येथील जयहिंद इंडस्ट्रीज या कंपनीने संजीवनी पाॅलिटेक्निकच्या तब्बल ३५ विद्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी दिली. 

जयहिंद इंडस्ट्रीज ही सर्व प्रकारच्या वाहनांना लागणाऱ्या सुटे भाग तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीला तांत्रिकदृष्टया सक्षम असणारे मनुष्यबळ संजीवनीमधून मिळाल्याने या विद्यार्थ्यांची निवड केली. निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये नवनाथ नरोडे, राहुल पाचोरे, आकाश गवारे, शुभम खैरणार, विलास टुपके, नयन जाधव, गणेश घेगडमल, योगेश खंडीझोड, आदिनाथ मिंड, स्वप्निल अधिकार, योगेश जाधव, शुभम धोकरट, ज्ञानेश्वर लोखंडे आदींचा समावेश आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे संजीवनी शिक्षणसंस्थेचे विश्वस्त अमित कोल्हे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.