Breaking News

फिफाची ४१ हजार कोटींची कमाई


नवी दिल्ली वृत्तसंस्था
फुटबॉलची सर्वात मोठी स्पर्धा फिफा विश्वचषक सुरू झाली असून ३२ दिवसांत ३२ संघांत ६४ सामने होतील. या स्पर्धेत आइसलँड (३.४० लाख) हा सर्वात कमी लोकसंख्येचा देश पहिल्यांदाच खेळणार आहे. चिप लावलेल्या टेलस्टार-१८ फुटबॉलने खेळता येईल. चिपमुळे स्मार्टफोन कनेक्ट होईल. ओपनिंग सामन्यात १४ मुली बॉल गर्ल असतील. यामध्ये भारताकडून रिषी, नथानिया जॉन हे बॉल कॅरिअर असतील. या स्पर्धेत व्हीएआर म्हणजे व्हिडिओ असिस्टंट रेफरी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. जे रेफ्रीचा निर्णय पडताळण्याचे काम करेल.फिफा देणार विश्वचषक मधील ३२ संघांना २७५० कोटींची बक्षीस रक्कम देणार आहे. तर विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला २५६ कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळणार आहे. तर १८९ कोटी उपविजेत्यांना आणि तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या संघाला १६२ कोटी मिळणार आहेत.