Breaking News

प्रा. पवार (कोकणे) यांना एम. फिल. पदवी प्रदान


संगमनेर : तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील प्रा. कविता पोपट पवार (कोकणे) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे एम.फिल. ही पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. डॉ. अशोक लिंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कविता पवार यांनी प्रा. आ. य. पवार लिखित ‘ऊनपाऊस’ काव्यसंग्रहाचे स्वरुप व आकलन या प्रबंधिकेतून ग्रामीण भागातील वर्तमान, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक जाणीवांची वास्तविक हुबेहुब वर्णन करणारी प्रबंधिका सादर केली होती. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख तसेच प्रा. रघुनाथ खरात, डॉ. राहुल हांडे, डॉ. बालाजी घारुळे, डॉ. लता देशमुख, प्रा. ज्ञानेश्वर कोकणे, शरद पवार, गोरक्षनाथ कोकणे, राधाबाई कोकणे, अतिक्षा कोकणे यांनी अभिनंदन केले.