Breaking News

निगडी प्राधिकरण भागात भरदिवसा घर फोडून अडीच लाखांचे सोने लंपास

पुणे - निगडी प्राधिकरण भागात भरदिवसा घर फोडून अडीच लाखांचे सोने लंपास केले. हा प्रकार प्राधिकरणातील सेक्टर नंबर 27 मध्ये घडला. विजयकुमार अनंतपूर (54) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार प्राधिकरणातील सेक्टर 27 अ मध्ये व्हिला बिल्डिंगमध्ये राहतात. ते आपल्या फ्लॅटला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेले. दुपारच्या वेळी अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटात ठेवलेले 2 लाख 49 हजार 600 रुपयांचे सोने घेऊन चोर पसार झाला.