Breaking News

ग्रामसेवकाकडून दहा लाखांचा गैरव्यवहार


सोलापूर - बार्शी येथील तत्कालीन ग्रामसेवक बी. डी. पाटील यांनी 10 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे अध्यक्ष भागवत संकपाळ, सरपंच तारामती खंडागळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. तत्पूर्वी निधीचा सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने गैरव्यवहार केल्याची तक्रार उपळे (दु) जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडे केली होती. त्यानंतर संकपाळ यांनी हरकत घेऊन विनाकारण सरपंचाचे नाव गोवण्यात येत आहे आणि सरपंचांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, गैरव्यवहाराची चौकशीच्या मागणी निवेदनात म्हटले आहे. झरेगावच्या मागास प्रवर्गातील महिला सरपंच निरक्षर आहेत, याचा गैरफायदा घेत ग्रामसेवक बालाजी पाटील यांनी 30 डिसेंबर 2017 रोजी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ग्रामपंचायतीला आलेला दहा लाख 99 हजार 755 रुपये जमा करण्यात आलेला निधी ग्रामसेवक यांनी सरपंचांचा बनावट अंगठा करून निधीचा गैरव्यवहार केला.