Breaking News

ब्रिटनच्या सुलभ व्हिसाच्या यादीतून भारतीय बाहेर


ब्रिटन सरकारने विद्यापीठात व्हिसा अर्ज प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी तयार केलेल्या नवीन यादीतून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर ठेवले आहे. ब्रिटनमध्ये स्थलांतर नियमातील बदला संबंधीच्या प्रस्तावाला संसदेत शुक्रवारी मांडण्यात आले. ब्रिटनच्या गृह खात्याने २५ देशांच्या विद्यार्थ्यांसाठी टियर-४ च्या व्हिसा श्रेणीच्या नियमांत शिथिलता आणल्याचे जाहीर केले. कोबरा बीयरचे संस्थापक व यूके कौन्सिल फॉर इंटरनॅशनल स्टुडंट अफेयर्सचे अध्यक्ष लॉर्ड करण बिलमोरिया यांनी सरकारचा हा निर्णय म्हणजे भारताचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.