Breaking News

पंतप्रधान कार्यालयावर धडकण्याची आम आदमी पार्टीची तयारी

आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रविवारी मोठ्या स्तरावर आंदोलनाची तयारी करत आहेत. पक्षाची मागणी पूर्ण न झाल्यास पक्षाचे आमदार व कार्यकर्ते पंतप्रधान निवासस्थानी रविवारी जोरदार आंदोलनाची तयार करणार आहेत. दरम्यान, केजरीवाल यांच्यासह इतर मंत्री व आमदारांचा शनिवारी सहाव्या दिवशीही राजभवनात ठिय्या सुरू होता. 

सनदी अधिकाऱ्यांनी त्यांचा अनिश्चितकालीन संप मागे घ्यावा यासाठी आयएएस संघटनेला आदेश देण्याची मागणी आपने केली आहे. कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे लोकाेपयोगी अनेक कामांचा खोळंबा झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून कामात अडथळे येत आहेत. त्याशिवाय गरिबांच्या घरी जाऊन रेशन वितरित करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या दिल्ली सरकारच्या प्रस्तावालादेखील मंजुरी देेण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.