Breaking News

‘दंडकारण्य’ पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ : आ. डॉ. तांबे ‘अमृत उद्योग’च्यावतीने पर्यावरणदिन उत्साहात


संगमनेर प्रतिनिधी

ग्लोबल वार्मिंगचा परिणाम म्हणून तापमान झालेली वाढ व पर्जन्यातील घट या समस्या निर्माण झाल्या आहेत. यापासून सजीवसृष्टीच्या रक्षणाबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, म्हणून सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरु केले आहे. हे दंडकारण्य अभियान पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ झाली आहे, असे प्रतिपादन अभियानाचे मुख्य प्रवर्तक आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. 

येथील अमृतेश्‍वर मंदीरात अमृत उद्योग समुहाच्यावतीने पर्यावरणदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ. प्रताप उबाळे, जगन्नाथ आव्हाड, विलास कवडे, समन्वयक बाळासाहेब उंबरकर, उपविभागीय वनाधिकारी मच्छिंद्र गायकर, किरण कानवडे, नामदेव कहांडळ, बाळासाहेब फापाळे, नामदेव डांगे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी अ‍ॅड. माधवराव कानवडे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. बाबा खरात यांनी पर्यावरणाची गाणी गायिली. प्रास्ताविक बाळासाहेब उंबरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. यावेळी अमृत उद्योग समुहातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण कानवडे यांनी आभार मानले.