परमेश्वर भक्तीचा भूकेला- जंगलेशास्त्री महाराज
कलीयुगामध्ये संसाररूपी भवसागरातून तरूण जाण्यासाठी भगवंताचे नाम हा सर्वोत्तम पर्याय असून आंतरिक भक्तीने परमेश्वर चरणी लीन होता येते, इश्वर हा केवळ भक्तीचाच भूकेला आहे, मनापासून केलेल्या भक्तीने शास्वत आनंद मिळत असल्याचे प्रतिपादन हभप पुुंंडलिक महाराज जंगलेशास्त्री यांनी केले.
गेल्या सात दिवसांपासून अहमदनगर शहरातील नंदनवन लॉन येथे श्रीमद्भागवत् कथेचे आयोजन करण्यात आले होते, याचा सामारोप जंगलेशास्त्री महाराज यांचे कीर्तनाने झाला, यावेळी ते बोलत होते.
समारोपप्रसंगी भाविक भक्तांना पुरणपोळीचे प्रसादरूपी जेवण देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हभप. भागवत महाराज शास्त्री, ज्ञानेश योग आश्रम संस्था यांनी परिश्रम घेतले.