शेतकर्यांच्या तोंडाला आश्वासनाची पाने पुसली
मागील वर्षी 1 जून रोजी शेतकरी संपाची संकल्पना प्रत्यक्षात आल्यावर सरकार हडबडून गेले, मात्र ढोंगी सरकारने शेतकर्यांची फसवणूक करीत त्यांच्या तोंडाला आश्वासनाची पाने पुसण्याचे घोर पाप केले. याशिवाय शेतकर्यांमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्रही केले. हे सरकार शेतकर्यांच्या जीवावरच सत्तेत आलेले असले तरी, आता ते अन्नदात्या शेतकर्यांच्या जीवावर उठले असल्याची टीका करुन नागवडे म्हणाले की, सरकारने शेतकर्यांच्या समस्या व मागण्या समजून घेवून त्यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात हीच आंदोलक शेतकर्यांची न्याय्य मागणी आहे. शेतकर्यांचे हक्क व शेतीमालाला रास्त भाव मिळण्याच्या मागणीसाठी एक जूनपासून सुरु होणार्या संप, आंदोलनात शेतकर्यांनी सक्रिय सहभागी होवून सरकारला आपल्या मागण्यांची दखल घ्यायला भाग पाडण्याची गरज आहे. शेतकर्यांच्या एैक्याची वज्रमूठ झाल्याशिवाय हे सरकार शेतकर्यांसमोर झूकणार नाही. शेतकर्यांनी पक्षीय राजकारणाची झूल बाजूला ठेवून आपल्या न्याय्य हक्काच्या लढाईत सहभागी होवून हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन नागवडे यांनी केले आहे.