केरळला मुसळधार पावसामुळे 25 जणांचा मृत्यू
तिरूवनंतपुरम : केरळमध्ये सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कोझिकोडेमध्ये मुसळधार पावसाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण बेपत्ता आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे, त्यामुळे मोठया प्रमाणात हानी झाली आहे. तर या मुसळधार पावसाने 24 जणांचा मृत्यू झाला आहे. कोझिकोडेच्या थेमरेसरीमध्ये भूस्खलनामुळे नऊ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे. मृत मुलीचे नाव डेलना आहे. भूस्खलनामुळे त्या मुलीचे घर ढिगा-याखाली दबले गेले आहे. इडुक्की, वेनाद आणि कोझिकोडे जिह्यांत भूस्खलन आणि रस्त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. आपत्ती प्रशासन विभागाने कोझिकोडेतल्या पूरग्रस्त स्थितीबाबत राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडेही मदत मागितली आहे. कन्नूर, कोझिकोडे, कोट्टायम आणि आलपुष्पा जिह्यात बचाव शिबिर स्थापण्यात आली आहेत. या जिह्यात शेतीला मोठय प्रमाणात नुकसान झाले आहे. कोझिकोडेमध्ये 474 लोक बचाव शिबिरात आहे. कोझिक ोडेमधले कक्कयम धरणाचे दरवाजे लवकरच उघडण्यात येणार आहेत. कोट्टयम आलपुष्पा, वायनाड आणि कोझिकोडे जिह्यातील जिल्हाधिकाऱयांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.