Breaking News

अकोले तालुक्यात ‘दंडकारण्य’ अभियान; वटपौर्णिमेला शुभारंभ

अकोले दंडकारण्य अभियान मागील वर्षी प्रमाणे यावर्षी प.पु. स्वामी गगनगिरी महाराज भक्त प्रतिष्ठाण राजूर व वनविभाग राजूर व अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असल्याची माहिती राजूरच्या सरपंच तथा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्षा सौ. हेमलताताई पिचड यांनी सांगितले.
या निमित्ताने अकोले येथे बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी अकोले नगरपंचायत च्या नगराध्यक्ष संगीता शेटे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा सौ. चंद्रकला धुमाळ, अ.ता.ए.सो.च्या सदस्या कल्पनाताई सुरपुरिया, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, मानवाधिकार कार्यकर्ते बाळा पवार, आबासाहेब देशमुख, राहुल देशमुख, विजय पवार आदी उपस्थित होते. गेल्या वर्षी प.पु.स्वामी गगनगिरी महाराज भक्त प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यामध्ये मोठया संख्येने वृक्षारोपन व वृक्षवाटप करण्यात आले होते.
यावर्षी बुधवार दि. 27 जून पासून वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर वृक्षारोपनाचा मोठा कार्यक्रम राजूरच्या आदर्श सरपंच हेमलताताई पिचड हस्ते व वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) भाग्यश्री पोले यांच्या अध्यक्षतेखाली हाती घेण्यात आला असून याची सुरुवात तालुक्यातील बदगी बेलापूर, शिरपुंजे, मवेशी, गोंदुशी, गारवाडी, राजूर, अकोले शहर, धुमाळवाडी, पानसरवाडी या गावातून होणार आहे. या वृक्षारोपन कार्यक्रमासाठी राजूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप जाधव व अकोले दोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी जे. डी. गोंदके आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रास्तविक बाळा पवार यांनी केले तर आभार प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी मानले.