Breaking News

चिमुरडीने पूर्ण केला ‘रोजा’


प्रवरानगर प्रतिनिधी
येथील साडेचार वर्षांच्या अलिया नासीरहुसेन बेग या चिमुरडीने कडक असे रोजा चे उपवास पूर्ण केले. उन्हाळा संपून पावसाळा सुरु होताना उष्ण आणि दमट अशा प्रतिकूल वातावरणामध्ये तिने हे उपवास पूर्ण केले आहेत. वर्षाच्या बारा महिन्यांत ‘रमजान’ महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात ‘अल्लाह’ला समर्पित होऊन रोजे करून डोळसपणे रमजान महिना जपला जातो. दरम्यान, कडक उपवास पूर्ण केल्याबद्दल या चिमुकलीचे सर्वत्र कौतूक होत आहे.