Breaking News

काश्मिरात बंद;दुकाने, सार्वजनिक परिवहन सेवा, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद


काश्मीर खोऱ्यात नागरिकांची हत्या होत आहे, युवकांना अटक केली जात आहे, असा आरोप करत त्याच्या निषेधार्थ फुटीरवादी नेत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे सोमवारी खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले. बंद आवाहनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यासीन मलिकला अटक केली, तर सैयद अली गिलानी, मीरवाइज उमर फारूक यांना त्यांच्या घरात नजरबंद केले.