Breaking News

नरोडा पाटिया प्रकरणातील ३ दोषींना १० वर्षांची शिक्षा



वृत्तसंस्था | अहमदाबाद गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात दंगलीदरम्यान २८ फेब्रुवारी २००२ रोजी नरोडा पाटियात ९७ अल्पसंख्याकांच्या हत्येशी संबंधित प्रकरणातील तीन दोषींना सोमवारी प्रत्येकी १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील राजकुमार चौमाल, पी. जे. राजपूत आणि उमेश भरवाड या तीन आरोपींना विशेष तपास पथकाच्या विशेष न्यायालयाने निर्दोष ठरवले होते. मात्र, उच्च न्यायालयाने या सर्वांना अलीकडेच दोषी ठरवले होते, पण त्यांच्या शिक्षेच्या कालावधीबाबतचा आपला निकाला राखून ठेवला होता.