Breaking News

राशिनच्या जगदंबा विद्यालयात प्रेरणा भागवत प्रथम

कर्जत तालुक्यातील राशिन येथील श्री जगदंबा विद्यालयातील विद्यार्थीनी प्रेरणा राजेंद्र भागवत हीने दहावीच्या परिक्षेत शेकडा 96.40 गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. स्वप्नाली दिनकर कोपनर हिने द्वितीय (95.40) तर वैष्णवी मिलिंद रेनुके व श्रावणी गणेश पोरे यांनी 93.60 गुण संपादन करुन तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यालयाचा निकाल 85.71 टक्के लागला. विद्यालयातील 10 विद्यार्थ्यांनी 90 टक्केपेक्षा अधिक गुण मिळविले. यामध्ये 8 विद्यार्थीनींचा समावेश आहे.

ओंकार महेश शेटे 93.40, अनुजा संतोष कानगुडे 93.40, देनाली महावीर बोरा 92.40, प्रिया मच्छिंद्र अंबोधरे 92.40, तनया भाऊसाहेब कानगुडे 91.60, आवेज अतिक मनियार 91.20.
विद्यालयातील 84 विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली. सर्व गुणवत्ता प्राप्त व उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौंसिल सदस्य राजेंद्र फाळके, उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी खंडेराव शेंडगे, विद्यालयाचे प्राचार्य दिलीप खंडागळे, उपप्राचार्या, पर्यवेक्षक, विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य शहाजी राजेभोसले, रामकिसन साळवे, हनुमंत लोंढे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकांसह विद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी शहाजी राजेभोसले, प्राचार्य दिलिप खंडागळे, उपप्राचार्या जोत्स्ना जोगदंड, पर्यवेक्षक राजकुमार चौरे, विकास मोढळे, सामाजिक कार्यकर्ते पोपट तोरकड, राजेंद्र भागवत, मिलिंद रेनुके आदी उपस्थित होते.