Breaking News

‘पद्मश्रीं’च्या भरलेल्या वटवृक्षाचा सर्वाना लाभ : विखे


लोणी / प्रतिनिधी

आज शिक्षणाबाबत समाजात जागृती झाली आहे. त्यामुळे गुणवत्ता वाढली, गुणवत्तेबरोबरच मुलांना पालकांनी करिअर स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. पद्मश्रींनी लावलेले शिक्षणाचे रोपटे बहरले असून त्याचा वटवृक्ष झाला आहे. या वटवृक्षाचा सर्वांना मोठा लाभ होत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.

राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील चाणक्य बहुद्देशीय प्रतिष्ठानच्यावतीने राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. पंचायत समितीचे माजी सदस्य पंढरीनाथ कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास विखे कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, पंचायत समितीच्या सदस्या नंदा तांबे, सरपंच पुनम तांबे, विखे पाटील कारखान्याचे संचालक प्रताप तांबे, अशोक गाडेकर, मुळा प्रवरेचे संचालक देवीचंद तांबे, माजी सरपंच गोरक्षनाथ तांबे, सरकारी वकील भानुदास तांबे, चंपालाल पारधे, सुदाम गाडेकर, नकुल तांबे, अप्पासाहेब माळवदे, भास्कर तांबे, भारत तांबे, आर. आर. गाडेकर, अशोकराव जंगम, प्रभाकर शिंदे, जगन्नाथ तांबे, विजय तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी चाणक्य प्रतिष्ठानचे संस्थापक गोरक्षनाथ तांबे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. महेश तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चाणक्य बहुद्देशीय प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडिओ निवेदक यमन पुलाटे यांनी केले. अशोक दहीवळकर यांनी आभार मानले.