Breaking News

दंडकारण्य अभियानांतर्गत जोर्वे येथे वृक्षारोपण


संगमनेर प्रतिनिधी

पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाची राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणात चळवळ असलेल्या संगमनेर तालुक्यात दंडकारण्य अभियानाअंतर्गत वनराई बहरली आहे. याचाच एक भाग म्हणून येथील पंडितराव थोरात यांच्या आर्थिक सहकार्यातून संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे १ हजार १०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. या अभिनव उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, बाबा ओहोळ, गणपतराव सांगळे, आर. बी. सोनवणे, बाळासाहेब शिंदे, मिनानाथ वर्पे, हौशीराम सोनवणे, सुरेश थोरात, दत्तात्रय खुळे, नानासाहेब दिघे, माणिकराव यादव, संजय थोरात, शांताबाई खैरे, स्वाती मोरे, सरपंच रविंद्र खैरे, दत्तात्रय काकड, शिवाजी दिघे, विक्रम थोरात, सोपान कोल्हे, बंटी यादव, राजू थोरात, ज्ञानदेव थोरात, मुख्याध्यापक प्रकाश खेमनर, सत्यजित थोरात आदी उपस्थितीत होते.

यावेळी अब्दुल कलाम विद्यार्थी मंचच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. पंडितराव थोरात म्हणाले, सहकारमहर्षि स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या अभियानाचे हे १३ वे वर्ष आहे. राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान लोकचळवळ झाली आहे. वृक्षसंस्कृती जोपासणार्‍या या चळवळीने देशपातळीवर लौकिक निर्माण केला आहे. प्रत्येक नागरिकाचा सहभाग हे या चळवळीचे यश आहे. यामुळे वृक्षतोड टळली असून उजाड बोडखी डोंगरे झाडांनी हिरवीगार दिसू लागली आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान कोल्हे यांनी केले. यावेळी गावातील सर्व संस्थानचे अधिकारी व पदाधिकारी परिसरातील महिला, नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सुरेश थोरात यांनी आभार मानले.