Breaking News

टीम वर्क या संस्थेच्या वतीने नाटक न येणार्‍यांचा मेळावा


सोलापूर, दि. 27, जून - इच्छा असूनही अभिनय करता येत नसेल तर अशा कलावंतांसाठी सोलापूरचे रविकांत मालपुरी संचलित टीम वर्क या संस्थेच्या वतीने नाटक न येणार्‍यांचा मेळावा आयो जित करण्यात आला आहे. तो 29 व 30 जून रोजी व 1 जुले रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत दमाणी ब्लड बँकेचा दुसर्‍या मजल्यावर डफरीन चौक येथे भरविला जाणार आहे. टीमवर्क विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आविष्कार करून सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीत भर घालण्याचा प्रयत्न करणार आहे याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून हा कार्यक्रम हा मेळावा सर्वांसाठी मोफत असणार आहे. वयाची मर्यादा नसून साधारण 3 वर्षापासून ते 60 ते 70 वयापर्यंतच्या कोणत्याही व्यक्तीने या टीमवर्क मध्ये सहभाग घेण्याची इच्छा दर्शवली की त्यांना संधी मिळणार आहे त्यामुळे ज्यांना या मेळाव्यात सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी नाव नोंदणीसाठी 9325549222 किंवा 8600383826 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.