Breaking News

स्वच्छ भारत सर्वेक्षण यादीत पिंपरी चिंचवड 43 व्या, पुणे शहराला दहावा क्रमांकाचे रँकिंग

पुणे, दि. 27, जून - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण यादीत पिंपरी चिंचवड शहराला 43 व्या क्रमांकाचे रँकिंग मिळाले आहे. 2016 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहर देशात नवव्या क्रमांकवर, तर राज्यात पहिल्या क्रमांकवर होते. तर, 2017 मध्ये घसरण होऊन 9 व्या क्रमांकावरुन शहर 72 व्या नंबरवर फेकले गेले होते. दरम्यान, यंदा टॉप टेनमध्ये नाही. परंतु, क ाही प्रमाणात शहराचे रँकिंग वाढले आहे. दुसरीकडे जवळचे पुणे शहराला दहावा, तर मुंबईला नववा क्रमांक मिळाला आहे. 

या सर्वेक्षणामध्ये 4041 शहरांचा समावेश करण्यात आलेला होता. व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये मा हिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे, या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता. पिंपरी-चिंचवड शहरात 4 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान राब विण्यात आले होते. त्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. शहरवासियांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत 41 हजार 493 जणांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केले होते. अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या स्पर्धेत पालिका 17 व्या क्रमांकावर होती. तसेच त्याचे 400 गुण देखील मिळाले होते.