विखे पाटील पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल
प्रवरानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पॉलिटेक्निकच्या परिक्षेमध्ये लोणी येथील विखे पाटील पॉलिटेक्निकने दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ठ निकालाची उत्तम परंपरा कायम राखली. अश्विन संजय आहेर याने ९० . ७३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला.
या परीक्षेत अमृता राजेंद्र काशिद हिने ८९ . १२ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि शुभम संभाजी रक्ताटे ८७ . ८२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला, अशी माहिती प्राचार्य मनोज परजणे यांनी दिली. तंत्रशिक्षण मंडळाच्या वार्षिक परिक्षेमध्ये या तंत्रनिकेतनच्या विद्यार्थीनींनीदेखील निकालामध्ये मुसंडी मारलेली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, विश्वस्त अण्णासाहेब म्हस्के, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रो. मनोज परजणे, आदींनी अभिनंदन केले.
