Breaking News

अन्यायाविरुद्ध विविध संघटनांचा एल्गार! तहसीलदारांना दिले निवेदन


कोपरगाव शहर प्रतिनिधी 
मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मातंग समाजावर अन्याय, अत्याचाराचे प्रमाणात वाढ झालेली आहे. या घटनेचा कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व बहुजन मागासवर्गीय व आदिवासी संघटनांच्यावतीने जाहीर निषेध करण्यासाठी व सदर घटनेतील आरोपींना लवकरात लवकर कडक शासन करण्यात यावे, या मागणीसाठी कोपरगाव शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. 

यावेळी विविध संघटनांच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेनात म्हटले आहे, भीमाकोरेगाव घटनेतील पूजा सकटचा संशयतरित्या झालेला खून, रुद्रवाडी, जिल्हा लातूर ते नवदाम्पत्याला मारुतीच्या मंदिरात प्रवेश केला म्हणून झालेली अमानुष मारहाण, क्रांतीवीर लहुजी साळवे यांची कमान लावली म्हणून नांदेड येथे संदीप जाधव यांचा झालेला खून, सिल्लोड येथील विठ्ठल वाघ यांचा संशयास्पदरित्या झालेला खून, पनवेल येथे विलास वाकुडे यांचा झालेला खून तसेच नुकतेच जळगाव जिल्ह्यातील वाकडे या गावी विहिरीत पोहण्यास गेले असता मातंग समाजातील तरुणांना झालेली अमानुष मारहाण या सर्व प्रकरणावरून महाराष्ट्रात जातीयवादी शक्तींचा प्रभाव वाढत आहे. अॅट्रॉसिटी कायदा शिथिल केल्यामुळे सदर प्रकरणात वाढ झालेली आहे. 

दरम्यान, यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चात लोकस्वराज्य आंदोलन, क्रांतीवीर लहुजी टायगर सेना, रिपब्लिकन पार्टी आठवले गट, स्वाभिमानी रिपब्लीकन ,भारिप बहुजन महासंघ मातंग युवा संघटना, एकलव्य भिल्ल समाज संघटना विश्वभूषण अण्णाभाऊ साठे फौंडेशन, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, घटनाकार मैत्री संघ, बुद्धीस्ट यंग फोर्स या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला. तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर सर्वश्री विधिज्ञ नितीन पोळ, विनोद राक्षे, सोमनाथ मस्के स, खदेव जाधव, शरद त्रिभुवन, सज्जन चंदनशिव, संदीप निरभवणे, नितीन साबळे, अनिल मरसाळे, प्रवीण शेलार, राजू रोकडे, अनिल पगारे, गणेश कांबळे, संजय साळवे, जयंत मरसाळे, बाळासाहेब सोळसे, राजेंद्र खैरनार, संजय तुपसुंदर, रंगनाथ मरसाळे, सोमनाथ अहिरे, सागर म्हस्के, शंकर बिराडे, बाबासाहेब शिंदे, महेश साळवे, ज्ञानेश्वर घोडेराव आदींच्या सह्या आहेत.