सर्वांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे : डॉ. पवार
राहुरी ता. प्रतिनिधी
प्लास्टिक बंदीचे महत्त्व सांगत सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो. त्यासाठी सर्वांनी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डाॅ. प्रकाश पवार यांनी केले.
तालुक्यातील शिवांकूर विद्यालयात गुलाबपुष्प आणि पुस्तक वाटप करून चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रशासकीय अधिकारी गो. भा. औटी यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व संवर्धन तसेच पर्यावरणाची स्वच्छता आदींचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राहुरी तहसीलचे पुरवठा अधिकारी शिवाजी टेमकर, प्रगतशील शेतकरी प्रभाकर नाना म्हसे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण खिलारी यांनी केले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, खजिनदार डाॅ. किशोर पवार, युवराज पवार, विश्वस्त उत्तमराव पवार, मुख्याध्यापिका श्रीमती छाया जाधव, शिक्षक सविता गव्हाणे, दिपाली थोरात, सुजाता तारडे, रोहिणी भाकरे, सविता काळे, म्हसे, नवले, तमनर, विजय शिंदे, वैरागर, आदिनाथ गायकवाड, लिपीक मनोज गुलदगड, शिपाई तमनर आदी उपस्थित होते. प्रिया जाधव यांनी आभार मानले.
