Breaking News

भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करा; दिव्यांग संघटना उपोषण करणार


शेवगाव प्रतिनिधी
भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही. विविध स्वरूपातील भ्रष्टाचार व घोटाळे होत असून यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पुराव्यासहित निवेदन देण्यात आले. मात्र संबंधितांविरुद्ध कुठलीच कारवाई होत नाही. त्यामुळे तालुक्यात सामाजिक कार्यात आघाडीने काम करणाऱ्या दिव्यांग संघटनेच्यावतीने दि.१९ रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे, असा देण्यात आला आहे. 

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मौजे पिंगेवाडी, शेवगाव येथील सन २०१४-२०१५ मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आणि घरकुल घोटाळ्याची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र शासकीय अधिकाऱ्यांकडून या कारवाईस दिरंगाई होत आहे.

त्यामुळे आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष चांद कादर शेख, बाबासाहेब महापुरे, किशोर सूर्यवंशी, बाहुबली वायकर, संभाजी गुठे, संदीप चेडे, हमीद शेख, सुनील करंजुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.