Breaking News

राहत्या घरात महिलेची आत्महत्या

येथील तपनेश्‍वर भागातील रहिवाशी असलेले भास्कर काशिनाथ बेरड यांच्या पत्नी आशा भास्कर बेरड (वय 30) यांनी शनिवारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुलगी, पती व सासू असा परिवार आहे.

शहरातील तपनेश्‍वर भागातील रामेश्‍वर कॉलनी येथे राहत असलेले भास्कर बेरड यांच्या पत्नी व लघु पाटबंधारे खात्यात काम करणारे बाळासाहेब चव्हाण यांची मुलगी आशा बेरड यांनी राहत्या घरात पहाटे 5 च्या सुमारास साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना सकाळी 7 वाजता घरच्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी येथील पोलीस ठाण्यात ही माहिती दिली, त्यानंतर पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हेडकॉन्स्टेबल बापू गव्हाणे, अजिनाथ बडे, पो.कॉन्स्टेबल गणेश साने, बाजीराव सानप यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांच्या वैद्यकीय अहवालानुसार जामखेड पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मयत आशा बेरड यांच्यावर अतिशय शोकाकूल वातावरणात तपनेश्‍वर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.