हायस्पीड मासेमारी प्रकरणी नितेश राणे पुन्हा आक्रमक
सिंधुदुर्गनगरी, दि. 12, एप्रिल - कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात पुन्हा धुडगूस घातला असून त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. यामुळे मालवणच्या पारंप रिक मच्छिमारांनी बुधवारी कणकवलीत आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. मच्छीमारांच्या व्यथा ऐकून संतप्त झालेल्या नितेश राणे यांनी यावेळी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांना दूरध्वनीवर संपर्क साधत त्यांची खरडपट्टी काढली. या प्रश्नी 13 एप्रिलला मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांची मच्छीमारांच्या शिष्टमंडळासह भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा मलपी ट्रॉलर्सनी धुडगूस घालायला सुरुवात केली असून मालवण नजीक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस अगदी 7 ते 8 वावात येऊन हायस्पीड ट्रॉलर्स मासेमारी करत आहेत. मात्र याकडे मत्स्यव्यवसाय विभाग दुर्लक्ष करत असून ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक मच्छिमार नाराज आहेत. अलीकडे 7 एप्रिलला येथील समुद्रात मासेमारी करणार्या लिओ क ाळसेकर या स्थानिक मच्छीमाराच्या जाळीचे हायस्पीड ट्रॉलर्सनी नुकसान केले. याबाबत काळसेकर यांनी मत्स्यविभागाच्या कार्यालयात माहिती देऊनही अद्याप पंचनामा करण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त मच्छीमारांनी बुधवारी कणकवलीत आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे व्यथा मांडली. यापूर्वी माजी खासदार निलेश राणे यांच्या मोर्चानंतर परप्रांतीय ट्रॉलर्सचे अतिक्रमण थांबले होते. मात्र पुन्हा एकदा हायस्पीडचे संकट निर्माण झाल्याचे सांगून यातून तोडगा काढण्याची विनंती मच्छीमारांनी केली. यावेळी संतप्त झालेल्या नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय अधिकारी वारुंजीकर याना दूरध्वनीवर संपर्क साधून लिओ काळसेकर यांच्या नुकसानीचा अद्याप पंचनामा न केल्याबद्दल जाब विचारला. दोन तासात हा पंचनामा न झाल्यास मालवणात येऊन स्वतः पंचनामा करून घेण्याचा इशारा नितेश राणे यांनी अधिकार्यांना दिला.
दरम्यान, 13 एप्रिलला आनंदवाडी येथे येणार्या मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचे हायस्पीड ट्रॉलर्स प्रश्नी मच्छिमारांच्या शिष्टमंडळासह लक्ष वेधणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.