Breaking News

देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती खा. शत्रुघ्न सिन्हा यांचा पक्षाला घरचा आहेर


वाराणसी - केंद्रात भाजप सरकार असूनही शेतकरी, दलित वर्ग सुखी नाही. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. 1975मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. ती आणीबाणी घोषीत होती. मात्र आताची परिस्थिती अधिक भयावह असल्याचे वक्तव्य भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी करत पुन्हा पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाआघाडीच्या दृष्टीने विविध पक्ष एकत्र येत आहे. आम आदमी पार्टीने येथील बेनियाबाग मैदानात सभेचे आयोजन केले होते. यात विविध पक्षांतील बंडखोर नेतेदेखील होते. याच सभेला संबोधित करताना शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला लक्ष्य केले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका करत त्यांनी आताच्या राजकीय, सामाजिक प रिस्थितीवर भाष्य केले. नोटबंदी आणि जीएसटी हे निर्णय जनतेच्या हिताचे नसून यामुळे लोक त्रस्त झाल्याचे ते म्हणाले. आणीबाणीविषयी ते म्हणाले, की 1975ला इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती. मात्र ती घोषित होती. येथील लाल राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा पराभव केला होता. मात्र आताची आणीबाणी घोषित नाही. त्यामुळे ती अधिक धोकादायक आहे. यापासून वाचण्यासाठी आपल्याला व्यवस्थेत परिवर्तन करावे लागेल. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.