एकमेकांना समजावून घेऊन जातीय सलोखा वृद्धिंगत करा - शंकरराव गडाख
नेवासा (प्रतिनिधी) - नेवासा येथे पठाण परिवाराच्या वतीने परंपरेने चालत आलेल्या सर्वधर्मीय ईद मिलन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकमेकांना समजावून घेऊन जातीय सलोखा वृद्धिंगत करा असे आवाहन माजी आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलतांना केले.
नेवासा येथील श्री मोहिनीराज मंगल कार्यालयामध्ये आयोजित सर्वधर्मीय ईद मिलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख होते. तर संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, राहता येथील मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना याहीया कासमी, ख्रिस्ती धर्मगुरू पास्टर खाजेकर, तहसीलदार उमेश पाटील, पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे, नेवासा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, जेष्ठ व्यापारी अशोकराव गुगळे, रमेश ओस्तवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार, रम्हुभाई पठाण, नगरसेवक लक्ष्मणराव जगताप, अँड.एम.आय पठाण. वकील संघाचे अध्यक्ष अशोकराव करडक, संभाजीराव पवार, नगर येथील उबेदभाई शेख, हज कमिटीचे जिल्हाध्यक्ष इरफानभाई सय्यद, बाळासाहेब पाटील, नवाबभाई बागवान यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक असिफभाई पठाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर जेष्ठ विधी तज्ञ एम.आय.पठाण यांनी प्रास्ताविक केले. सर्व मान्यवरांचा पठाण परिवाराच्या वतीने शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला.