शेतकर्यांनी गट शेतीला प्राधान्य द्यावे ः अशोक आढाव
कोपरगाव / ता. प्रतिनिधी
शेतकर्यांनी कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी गट शेतीला प्राधान्य देण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे उन्नत शेती-समृद्ध शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसंत भाकरे होते. शेतकर्यांनी शेततळे करुन त्यावर ठिबक सिंचन बसवावे. जमिनीत पाणी जिरविन्यासाठी बांध बंदिस्ती करावे, आपल्या शेतातून पाणी बाहेर जावू देऊ नये, तसेच बोंडअळी नियंत्रणसाठी एकाचवेळी कपाशीची लागवड करावी, त्यामुळे फवारणी एकाच वेळी येते. पळाटी काढून ती नस्ट केल्याने रोगावर नियंत्रण मिळविता येते.
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत. फळ्बाग अनुदान, ठिबकसाठी अनुदान, शेतीचे अवजारे, कांदाचाळ, ट्रॅक्टरसाठी, प्लास्टिक कागद अनुदान दिले जाते. याचा शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी सरपंच संगीता आहेर, उपसरपंच आप्पासाहेब काजळे, कृषी पर्यवेक्षक एम.आर. मंडलिक, मंडलाधिकारी ए.के. आरणे, कृषी सहाय्यक ए.पी. सावंत, लक्ष्मण चौधरी, रंगनाथ काजळे, जनार्दन जगताप, संदीप काजळे, प्रभाकर भाकरे, प्रकाश करडे, अशोक काजळे, संदीप भाकरे, सोपान काळे, दीपक चौधरी, किशोर तायडे यांचेसह अनेक शेतकरी उपस्थित होते.