Breaking News

भाडेकरुंकडे 87 लाख, 92 हजार, 586 रुपयांची थकबाकी


पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ’ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विविध ठिकाणच्या भाजी मंडई व मच्छि मार्केटमधील एकूण 27 भाडेकरुंकडे 87 लाख, 92 हजार, 586 रुपयांची थकबाकी आहे. येत्या 14 दिवसात थकबाकीदारानी ही रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा समावेश आहे. या शाळेकडे सर्वाधिक 52 लाख, 96 हजार, 800 रुपये एवढी थकबाकी आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ’ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शहराच्या विविध भागांमधील मिळकती भाडेतत्वावर व्यवसायिकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये पिंपरीतील महापालिकेच्या मालकीची शाळा इमारत ही इंदिरा गांधी इंग्लिश मिडीयम हायस्कुलला भाडेतत्वार वापरण्यास दिली होती. या शाळेकडे सर्वाधिक 52 लाख, 96 हजार, 800 रुपये एवढी थकबाकी आहे.याशिवाय पिंपरीतील यशवंतराव चव्हाण व्यापार संकुलातील पाच थकबाकीदारांकडे 10 लाख 53 हजार, 776 रुपये, थेरगाव येथील मच्छि मार्केटमधील तीन गाळेधारकांकडे 45 हजार,866 रुपये, थेरगाव मटण मार्केटमधील पाच गाळेधारकांकडे 82 हजार, 706 रुपये तर थेरगाव भाजी मंडईतील एकून 13 गाळे धारक ांकडे 23 लाख, 13 हजार, 438 रुपये अशी एकूण 87 लाख, 92 हजार, 586 रुपयांची थकबाकी आहे.