Breaking News

तृषार्त 8 जूनला चित्रपटगृहात

पुणे, दि. 02, जून - नातेसंबंध हा मानवी जीवनाचा गाभा आहे. कोणतंही नातं टिकवण्यासाठी, ते खुलवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते त्या नात्यात असणारं प्रेम. आजच्या काळात मात्र नातेसंबंध दुरावत असल्याचे आपण पाहतोय. बदलती सामाजिक परिस्थिती, भौतिक गरजा यामधून विसंवाद निर्माण होतो. तोच कारणीभूत ठरतो नात्यांमधील विद्रोहाला. हाच विसंवाद केंद्रस्थानी असलेला ‘तृषार्त’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 8 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘यशोभूमी एन्टरटेन्मेंटस’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाच्यानिर्मात्या सविता मोरे असून दिग्दर्शक अरुण मावनूर आहे.

कृष्णा आणि भाऊराव या दाम्प्त्याच्या आयुष्यावर ‘तृषार्त’ चित्रपटाची कथा बेतली आहे. काही माणसं नातेसंबंधांपासून पळ काढीत स्वतःचं एक वेगळं विश्‍व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कृ ष्णा आणि भाऊराव यांच्या मुलांनी ही स्वत:च वेगळं विश्‍व निर्माण केलं आहे. पती-पत्नीच्या नात्यातील वीण आणि मुलांच्या नात्यातील भावनिक द्वंद्व याचं चित्रण या चित्रपटात केलं गेलंय. क ालानुरूप बदलत गेलेली नात्यांची समीकरणं या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. ज्योती निवडुंगे, महेश सिंग राजपूत,अमूल भुटे, दिलीप पोतनीस, वृंदा बाळ, डॉ. जाधव, निलांगी रेवणकर, योगिता चौधरी, अक्षय वर्तक, निशांत पाथरे, विनया डोंगरे, मिलीषा जाधव, भूमी मोरे, लवेश शिंदे, चंद्रकांत मिठबावकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.