Breaking News

तोरणमाळ येथे यशवंत तलावात सापडाल 60 किलोचा मासा


नंदुरबार, दि. 11, जून - तोरणमाळ येथील यशवंत तलावात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या आदिवासी तरुणांना जवळपास 55 ते 60 किलो वजनाचा मासा सापडला. सिल्व्हर आफ्रिकन जातीचा हा मासा आहे. तोरणमाळ हे राज्यातील दुसर्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ येथील यशवंत तलावात बाराही महिने मोठ्या प्रमाणात पाणी असते. या ठिकाणी मासेमारी करुन आ दिवासी आपला उदरनिर्वाह करत असतात. नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणांनी मासेमारीसाठी जाळ टाकलं असता, त्यांच्या जाळ्यात हा मासा सापडला.