Breaking News

जिल्हा परिषदेतील जलशुद्धीकरण यंत्रणा बंदच


सोलापूर - जिल्हा परिषदेत लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेली सौरसंच यंत्रणा देखभाल दुरुस्तीअभावी मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष के लेल्या पदाधिकारी व अधिकार्‍यांनी 70 लाखांची पुन्हा नवीन यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 
जिल्हा नियोजन समितीतून सात वर्षांपूर्वी सौरसंच बसविण्यात आले. पण, गेल्या काही वर्षांपासून ती यंत्रणा दुरुस्तीअभावी बंद आहे. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने लाखोंची यंत्रणा धूळखात पडून आहे. झेडपीला दर महिन्याला दीड ते पावणेदोन लाख रुपये वीज बिल येते. उत्पन्न वाढ व खर्चामध्ये बचत करण्यासाठी नवीन सौरसंच बसविण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने सादर केला. 70 लाखांचा तो प्रस्ताव आहे. पण, पूर्वीच्या यंत्रणेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. जलशुद्धीकरणासाठी 2016 मध्ये सेस फंडातून 10 लाख खर्चून स्वतंत्र यंत्रणा बसविण्यात आली. पण, देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे गेल्या दीड महिन्यांपासून जलशुद्धीकरण संच बंद आहे. दरम्यान सौरसंच आणि जलशुध्दीकरण यंत्रणा दुरुस्तीच्या सूचना देण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांनी सांगितले.