Breaking News

शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके - पराग मुंढे


पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाने बालभारतीकडून मागविलेली (पहिलीची वगळता) सर्व शालेय पाठ्यपुस्तके दाखल झाली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत 20 कें द्रावरून ती वितरित करण्यात येतील. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके असतील, असे शिक्षण विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांनी सांगितले. समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यासाठी 2018-19 या शैक्षणिक वर्षातील महापालिका शिक्षण विभागाने बालभारतीकडे सहा लाख दोन हजार 596 पुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार बालभारतीने पुस्तकांची छपाई केली. शिक्षण विभागाच्या एकूण मागणीपैकी 86 टक्के पुस्तके महापालिकेच्या पिंपरी आणि आकुर्डीच्या शहर साधन केंद्रावर दाखल झाली आहेत.