Breaking News

रमजान विशेष लेख-5 जकात अदा करुन स्वत:च्या मालाचे रक्षण करावे


इस्लाम धर्माचे चौथे मुलतत्व म्हणजे जकात. जकात ही आपल्या मालमत्तेवर आदा करावयाची असते. वर्षभरात जकात केव्हाही अदा केली तरी चालते. मात्र जास्त पुण्यप्राप्ती हेतूने रमजान महिन्यात विशेष करुन जकात आदा केली जाते.
जकात म्हणजे ऐपतदार मुस्लीमाने आपल्या मालमत्ता व प्राप्तीवर आदा केलेला टॅक्स होय. ज्या नागरिकाजवळ साडेसात तोळे सोने किंवा साडेबावन्न तोळे चांदी किंवा त्याच्याएवढ्या मुल्याची रोख रक्कम अगर मालमात्ता असेल तर त्याला जकात आदा करणे वाजीब आहे. जास्त जकात लागू झाली त्याला साहिबे निसाब म्हणतात. ज्याने जकात आदा क रण्यास पात्र असूनही तो आदा केली नसेल तर तो सख्त गुन्हेगार ठरतो. एक वर्षाची मुदत पूर्ण झालेल्या मालावर रोख रक्मेवर, सोन्या-चांदीच्या वस्तूवर, वाहनावर जकात अदा करणे आवश्यक आहे.
जकातीच्या आदायगीबाबत प्रेषित पैगंबरांनी सक्त ताकीद केली आहे. ज्याप्रमाणे लोखंड भट्टीत घातल्यावर त्याचा गंजलेला भाग साफ होऊन ते स्वच्छा होते व मळ निघून जातेा त्याचप्रमाणे आपल्या मालावर जकात आदा केल्याने माल व धनसंपत्ती स्वच्छ होते. जे लोक आपल्या वर्षाचा उत्पन्नाचा व्यवस्थित हिशोब ठेऊन योग्य प्रकारे जकात आदा करीत नाहीत असे लोक जकातीच्या गुन्ह्यास पात्र तर ठरतातच, पण वर्षभर त्यांना काही ना काही संकट, आजारपण, कटकटी यांना तोंड द्यावे लागते, असा अनुभव आहे. यासाठी आपल्या धंद्यातील उत्पन्नाचा वार्षिक पगाराचा योग्य हिशोब ठेऊन व्यवस्थितरित्या जकात आदा करावी. जकात आदा केल्याने अल्लाह राजी होतो. तसेच आपल्या सर्व प्रकारच्या मालमत्तेचे रक्षणही करतो. जे लोक योग्य प्रकारे जकात आदा करतात त्यांचे कधीही नुकसान होत नाही व ज्या माललावर जकात आदा केली जाते असा माल, धन, संपत्ती ही आगीासून, पाण्यापासून हवेपासून एवढेच नव्हे सर्व प्रकारच्या नुकसानीपासून सुरक्षित राहते.
दैनंदिन जीवनात व्यापारी वर्ग नगरपालिकेपासून मालाची जकात चोरण्याचा प्रयत्न करीत असतो. (आता राज्यात जकात कर रद्द झाल्याने हा प्रश्‍न संपलाच) कोणीही असो खोटी बिले दाखवून कमीत कमी जकात आदा करण्याचा प्रयत्न करीत होता. काही जण खाजगी वाहनातून माल आणून जकात वाचवायचे काही जण शहराच्या हद्दीबाहेर माल उतरवून नंतर तो शहरात आणीत. तात्पर्य जगामध्ये जकात आदा न करता ती संपविण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करायचा. पंरतु इस्लाममधील जकात आदा करण्यासाठी कोणताही जकात नाका नाही. मात्र प्रत्येकाची नियत हाच यासाठी प्रमुख निकष आहे. करण ही जकात प्रत्येकाच्या स्वत:च्या भल्यासाठी आहे. या जकातीपासून तो स्वत:च्या आखेरतचा शिदोरी तयार करीत असतो. त्यामुळे जो कोणी इमाने इतबारे जकात आदा करील तो अल्लाहच्या इनामला पात्र राहील व जो ऐपत असूनही जकात आदा करण्यात कुचराई करील तो अल्लाहच्या शिक्षेत.स पात्र राहील ज्यावेळी आपल्या मालाचे काही नुकसान होते. जसे आग लागणे, चोरी होणे, पावसात मालाचे नुकसान होणे अशावेळी आपण जकात आदा करण्यात कुचराई केली हे समजून घ्यावे. यासाठी प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नाचा हिशोब लिहून ठेवून दरवर्षी जकात आदा करावी.
जकातीचे प्रमाण हे अडीच टक्के आहे. म्हणजे आपल्या वार्षिक नफ्याच्या रकमेवर हजाराला पंचवीस रुपये प्रमाणे जकात आदा करावी. जकातीचा पैसाहा कोणास देता येइेल याचे निकषही इस्लामने जगजाहीर करुन दिले आहे. जकात देणे हे प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी द्यावयाचा आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे.
जकात आदा करतांना आपले जवळचे नातेवाईकांना प्रथम प्राधान्य द्यावे. कारण ज्याची गरिबी आहे अशा गरजूंना जकातची रक्कम देणे इष्ट आहे. कारण प्रत्येकाचे काही नातेवाईक गरीब असतात. परंतु जीवनाच्या रोजच्या व्यापात आपण अशा गरजू नातेवाईकांकडे दुलर्र्क्ष करतो. जकातीच्या उत्पन्नावर अशा जवळच्या नातेवाईक मग ते भाऊ असो, बहीण असे अगर अन्य अशांना जकातचा पैसा देणे जायज आहे. त्याचबरोबर समाजातील गोरगरीब गरजू, अनाथ विधवा, अपंग, आजारी लोकांनाही जकात दिली जाते. जकातीचा प्रमुख उद्देश म्हणजे समाजात कोणीही उपाशी राहू नये. सर्वाच्या दैनंनिद गरजा पूर्ण व्हाव्यात हाच आहे. जकात लागू करुन इस्लामने सर्व लोकांना समानता आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज भारतात हजारो अरबी मदरसे हे जकातीच्या उत्पन्नावर चालतात. त्यांना शासनाचे कोणतेही अनुदान नाही व हे मदरसे या अनुदानाचे मोहताजही नाहीत. एकट्या मुंबईतील लोक रमजान महिन्यात कोट्यावधी रुपयांची जकात आदा करतात. ही जाकतीची रक्कम देशभरातील मदरसे व गरजूनी पोहोचते. या अरबी मदरसामधून समाजातील अनाथ मुले विशेष करुन शिक्षण घेत असतात. मदरसामधून या मुलांच्या जेवणाचा, कपड्यांना, औषध पाण्याचा खर्च केला जातो. जकातीमुळे समाजात समानता निर्माण होते. त्याचप्रमाणे गरजूंची गरज भागवून एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ हे ब्रीद प्रत्यक्षा त साकार केले जाते.
-----
शब्दांकन- आबीद खान दुलेखान
मो. 9860477869