Breaking News

मारहाण करत 50 हजार लुबाडले


कल्याण डोंबवली सह आसपासच्या परिसरात भामट्यानी एकच धुमाकूळ घातला असून नागरिकांना भूलथापा देत एका बाजूला देऊन मारहाण करत त्याच्याजवळील कि मती ऐवज लुबाडण्याच घटना वाढल्या आहेत. दिवा पुर्वेकडील चाळकेनगरातील श्रीसाई चाळीत राहणारे दिलीप रविदास हे गेल्या डोंबिवली पूर्वेकडील चार रस्त्यावरील बँकेत 50 हजार रुपये रोकड भरण्यासाठी आले होते. याच दरम्यान दोन अज्ञात इसमांनी त्यांना स्लिप भरून देण्यास सांगितले. यावेळी रविदास यांनी त्यांना पॅन नंबर विचारला असता त्यांनी भाऊ बाहेर उभा आज त्याच्याकडे पॅन कार्ड असल्याचे सांगत रवीदास याना बाहेर नेले. बाहेर पडताच बाहेर उभ्या असलेल्या इसमाने त्याना मारहाण करत त्यांच्या खिशातील 50 हजारांची रोकड काढून तेथून पळ काढला. या प्रक रणी रविदास यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसानी अज्ञात त्रिकुटा विरोधात गुन्हा नोंद केला आहे.