Breaking News

विजापूर वेसकडे येणारे आठ मार्ग 16 जूनपर्यंत बंद


रमजान ईदच्या उत्सवानिमित्त मीना बाजार विजापूर वेस या ठिकाणी भरतो. याठिकाणी वाहने जाणे-येणे धोक्याचे आहे, असे पत्रक पोलीस आयुक्त कार्यालयाकडून क ाढण्यात आले आहे. 12 दिवसांसाठी विजापूर वेसकडे येणारे आठ मार्ग बंद करण्यात आलेत. यामध्ये बेगम पेठ पोलीस चौकी, बाराईमाम चौक, बाकळे प्रेस , लक्ष्मी मार्केट, पंचकट्टा, पेंटर चौक, रंगरेज बोळ व माणिक चौकाकडून विजापूर वेसकडे येणारा रस्ता बंद केला आहे. वाहनासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी माणिक चौक-समाचार चौक-भावसार पथ, बाराईमाम चौक- किडवाई चौक मार्गे बेगमपेठ पोलिस चौकी- पंचकट्टा, लक्ष्मी मार्केट- दत्त चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा. हा आदेश 6 जून सकाळी 8 ते 16 रोजी रात्री बारापर्यंत अमलात राहील, आदेशाचे भंग केल्यास कायद्याप्रमाणे शिक्षेस पात्र होईल.