नगर-सोलापूर रोडवर पोलिसांची पिटा अंतर्गत कारवाई; 3 महिला ताब्यात
श्रीगोंदा / प्रतिनिधी ।
तालुक्यातील नगर-सोलापूर रोडवर घोगरगावजवळ देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी अचानक छापा मारून त्या ठिकाणाहून 3 पीडित महिला ताब्यात घेतल्या आहेत, मात्र तेथील मालक त्या ठिकाणाहून पसार झाला.
श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव परिसरातून जाणार्या नगर सोलापूर रोडवर एका बंद पडलेल्या हॉटेलच्या मागे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुप्त माहितीदारांकडून पोलिसांना मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे याच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पो.नि.बाजीराव पोवार यांनी यासाठी पथक नेमले, त्या पथकाने नगर सोलापूर रोडवर घोगरगावजवळ बंद पडलेल्या हॉटेल दोस्तीच्या मागील बाजूस असलेल्या खोलीत वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी, एक बनावट ग्राहक पाठवून पूर्ण खात्री झाली असता, अचानक छापा मारला. त्याठिकाणी 3 पीडित मुली आढळून आल्या असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे, मात्र चालक संदीप विलास शिंदे रा. घोगरगाव ता. श्रीगोंदा हा फरार झाला. त्याच्यावर पोकॉ. अविदा जाधव यांच्या फिर्यादीनुसार भादंवि 370/3 नुसार अवैध वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणे तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक 1956 चे कलम 3, 4, 5, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गिरी, महावीर जाधव, पो.हे. अमोल अजबे, संतोष धांडे, बांगर आदी कर्मचार्यांचा समावेश होता.